औंढा नागनाथ/अरविंद किर्तने महाराष्ट्रभर आणि विशेषतः मराठवाड्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो लोकांचे कुटुंब उध्वस्त झाले, लोकांची घरेदारे पाण्यामध्ये गेली, शेतीचे अफाट नुकसान झाले याबाबतीतले वृत्तांकन वृत्तपत्रांमध्ये आणि वाहिन्यांवर बघून व्यथीत झालेल्या निवृत्त शिक्षिका छाया विद्यासागर पालकर रा.छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे मराठवाड्यासह राज्यातील महापूर व ढगफुटीमुळे ओढवलेल्या !a!नैसर्गिक आपत्तीग्रस्तांपैकी दुर्लक्षित असलेल्या आणि मदत न पोहोचलेल्या उखळी तालुका औंढा नागनाथ येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे १०० किट तयार करून वितरण करण्यात आले. सदरील किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तुरीची डाळ एक किलो चण्याची डाळ, शेंगदाणे, एक लिटर खाद्यतेल, साखर, चहा पत्ती, मीठ, हळद पावडर, मिरची पावडर, मसाला जिरे, मोहरी, कपड्याची व आंघोळीची साबण मेणबत्ती, काडीपेटी तसेच उबदार रग आणि काही प्रमाणात महिलांसाठी साड्या असे एकूण रक्कम रुपये १,३५,०००/- किमतीचे साहित्य वाटप करण्यात आले. येथे नुकसानग्रस्त गरजू १००कुटुंबियांना मदत करण्यात आली.
छत्रपती संभाजी नगर येथून येऊन उखळी या गावी प्रत्यक्ष सौ. छाया पालकर आणि त्यांची कन्या अंजली पालकर हे ॲड .बाळासाहेब मगर यांच्यासह येऊन शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे आणि माऊली मगर व दोडगाव येथील तरुणांच्या सहकार्याने सदरील चीज वस्तू वाटप करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना निवृत्त शिक्षिका छाया पालकर यांनी शेतकऱ्यांवर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्या अत्यंत व्यथीत झाल्यामुळे त्यांचे स्वेच्छेने शक्य होईल तेव्हढी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुणीही खचून न जाता या नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन केले. उखळी गावातील शेतकऱ्यांची मागील वर्षी देखील अवकाळी पावसामुळे सुमारे ३०० एकरवरील पिकांची नुकसान झाले होते
Leave a Reply