औंढा नागनाथ/अरविंद किर्तने:शहरात कालिंका माता मंदिर आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्ताने नवदिवस धार्मिक कार्यक्रम असतात. दरवर्षी नवरात्र झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. आमदार संतोष बांगर यांनी दुपारी दोन वाजता कालिंका माता देवीचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मा.कृषी सभापती फकीरा मुंडे,नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष अनिल देव ,मा. उपसभापती अनिल देशमुख, तालुकाप्रमुख तथा नगरसेवक साहेबराव देशमुख,नगरसेवक मनोज देशमुख शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.नवरात्रमध्ये गजानन पाठक, प्रशांत स्वामी , नागेश काळे,संतोष देशमुख ,तुकाराम पांडे ,कैलास शिंदे, जितेंद्र नेव्हल हे परिश्रम घेतात.
.
Leave a Reply