औंढा नागनाथ/अरविंद किर्तने,तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी अमृता मारुती पावडे यांनी ओला दुष्काळ सरकार जाहीर करत नाहि म्हणून खिशात चिट्ठी लिहून शेतातील आखाड्यावरच्या पत्रातिल एंगला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना आज दि.05 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.अमृता मारुती पावडे
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात पावसाचा हाहाकार होऊन सर्व शेतकऱ्यांचे शेत पीक उध्वस्त झाले आहे सर्वत्र शेतकरी देशोधडीला लागला असून शेतकऱ्याकडे तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला त्यातच दरवर्षी नापिकी ढगफुटी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात मुस्कान होतच चालली आहे त्यातच सरकार कर्जमाफी देतो कर्जमाफी करतो म्हणून अजून वला दुष्काळी जाहीर केला नाही. व या पावसाळ्यात माझ्या शेतातील सर्व पीक उध्वस्त होऊन सर्वत्र पिकाचा नासोडा झाला आहे त्यातच आता नेमके जीवन जगायचे कसे हा प्रश्न मोठा निर्माण झाला असून आज दिनांक 05 सप्टेंबर रोजी सकाळी अमृता पावडे हे शेताकडे जातो म्हणून घरी सांगून गेले शेतात गेले असता पाठीमागून त्यांची पत्नी व मुलगा त्यांच्या डब्बा घेऊन 10 वाजता शेताकडे आले असता त्यावेळी आखाड्यावर बघितले तर अमृता पावडे हे आखाड्यावर एंइला दोरी गळ्यात घालून आत्महत्या केलेल्या अवस्थेत दिसल्याने मुलगा व पत्नीने आरडा ओरड केली त्या क्षणी जवळील आखाड्यावर शेतकऱ्यांनी धाव घेतली त्यावेळी जवळा बाजार पोलीस चौकी येथे दूरध्वनी वरून पोलीस ला कळविण्यात आले घटनास्थळी जमादार इम्रान सिद्दिकी व पोलीस शिपाई अंबादास बेले यांनी अमृता पावडे यांचा मृत्यदेह खाली सोडण्यात आला त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीत लिहिले होते की ओला दुष्काळ सरकार जाहीर करत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, त्यानंतर अमृता पावडे यांना जवळा बाजार येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात सवछेदन स्वछदन वैद्यकीय अधिकारी केंद्रे साहेब यांनी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.तर टाळगव्हाण येथे त्यांच्या सायंकाळी 04.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात आला त्यावेळी टाकळगव्हाण सह परिसरातील नागरिक हाळहाळ व्यक्त करीत होते.
अमृता पावडे यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली आई वडील भाऊ असा मोठा परिवार आहे.
Post Views: 591
Leave a Reply