औंढा नागनाथ/अरविंद किर्तने,शहरातील मनोज देशपांडे यांचा मुलगा अभिषेक मनोज देशपांडे यांना United States of America मधील Amazon कंपनीने Cybersecurity Consultant या पदावर निवडले आहे. त्याच्या असामान्य प्रतिभा, प्रामाणिक मेहनत आणि चिकाटीमुळे कंपनी तो काम करत आहे. कंपनीकडून त्याला चांगले पॅकेज देखील मिळत आहे. औंढ्यासारख्या शहरातील एखांदा तरुण अमेरिकेमध्ये नोकरी करतो. यामुळे नवतरुण युवकांना प्रेरणा मिळते. आपणही चांगला अभ्यास केला तर मोठ्या शहरांमध्ये कंपनीत काम करू शकतो ,अशी प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये जागृत होत असते. हे तेवढेच खरे…!
अभिषेक देशपांडे हा अमेरिका येथे कंपनीत लागल्यामुळे अनंत महाराज सुरेगावकर व विश्वनाथ चव्हाण गलांडी यांनी अभिषेक यांचे वडील मनोज देशपांडे व आई मनीषा देशपांडे यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच औंढा शहरातील व्यापाऱ्यांनी देखील सत्कार केला .त्यामध्ये राजू झांझरी ,श्रीराम राठी, डॉ सत्यनारायण अग्रवाल ,संजय पाठक, बंडू भोपी, राजू चोंढेकर ,पांडुरंग धवसे, वैभव बंगाळे यांनी देखील देशपांडे कुटुंबीयांचा सत्कार केला.
Leave a Reply