औंढा नागनाथ/अरविंद किर्तने,तालुक्यातील जलालदाभा येथे वन्यजीव सप्ताह शनिवारी (ता. 3 )रोजी साजरा करण्यात आला. विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे ,सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने,वनपरिक्षेत्र अधिकारी औंढा प्रा.विश्वनाथ टाक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताहनिमित्त वनपरिमंडळ शिरडशहापूर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळा जलालदाभा येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीव स्पर्धा ठेवण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व रोपे भेट देण्यात आली.कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळा जलालदाभा मुख्याध्यापक एस सावळे व तंटामुक्ती अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकवृंद व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वनपरिमंडळ अधिकारी रावणपल्ले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वनरक्षक व्ही आर.राठोड, व्ही.पी.शिंदे, जी. एल.गारोळे परिश्रम घेतले.
जलालदाभा येथे वन्यजीव सप्ताह साजरा

Leave a Reply